मराठी भाषा गौरव दिन २७ फेब्रुवारी २०२६
by Vinay Jadhav
२७ फेब्रुवारी २०२६ रोजी आमच्या श्री चिनाई वाणिज्य व अर्थशास्त्र महाविद्यालयात मराठी भाषा गौरव दिन उत्साहात साजरा करण्यात आला. हा दिवस ज्येष्ठ कवी विष्णू वामन शिरवाडकर (कुसुमाग्रज) यांच्या जयंतीनिमित्त साजरा केला जातो. कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले. प्राचार्यांनी मराठी भाषेचे महत्त्व सांगून विद्यार्थ्यांना मातृभाषेचा अभिमान बाळगण्याचे आवाहन केले.











